श्री. तपन सिंघेल,
एमडी आणि सीईओ,
बजाज आलियांझ जनरल इन्श्युरन्स
भारत हे वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेलं प्रगतीशील राष्ट्र आहे. जिथे आदराचं मूल्य जपलं जातं आणि ज्येष्ठांची काळजी हा पिढिजात संस्कारांचा भाग ठरतो. हेल्थ इन्श्युरन्स निश्चितच काळाची गरज बनली आहे. पॉप्युलेशन रेफरन्स ब्युरोने जाहीर केलेल्या अलीकडील आकडेवारीनुसार, वर्ष 2050 पर्यंत भारतात 14.4 कोटी ज्येष्ठ नागरिक असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या आरोग्याची जपवणूक करणं ही आपली जबाबदारी ठरते. ज्येष्ठांचे आयुष्य हे जसा अमूल्य स्मृतींचा ठेवा असतो. त्याचप्रमाणे विविध आजार आणि जीवनशैली विषयक विकारांना बळी पडण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ इन्श्युरन्स एकप्रकारे पालकत्वाची भूमिका निभावतो. ज्याद्वारे कोणत्याही आर्थिक भाराच्या शिवाय गुणवत्तापूर्ण आरोग्याची निगा मिळण्याची हमी मिळते.
या हेतू डोळ्यासमोर ठेऊन, Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) द्वारे ज्येष्ठांच्या आरोग्य कल्याणाच्या हेतूने महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. ज्याद्वारे पारदर्शी आणि सहज उपलब्ध योग्य हेल्थ इन्श्युरन्स पर्याय ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त करणे शक्य ठरेल. इन्श्युरन्सच्या कक्षेबाहेरील वाढत्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येचा विचार करिता या धोरणात्मक निर्णयामुळे पहिल्यांदाच इन्श्युरन्स घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना इन्श्युरन्स अधिक उपलब्ध योग्य ठरेल. यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांना अनुरुप नावीण्यपूर्ण इन्श्युरन्स प्रॉडक्ट निर्मितीसाठी निश्चितच चालना मिळेल. वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक कवच प्राप्त होईल. तथापि, हे नियमन विविध अडचणींना सामोरे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सहित सर्व नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल. ज्यामध्ये विशिष्ट विकारांसाठी आणि पूर्व-वैद्यकीय स्थितीत प्रतीक्षा कालावधीत कपात, आजीवन पॉलिसी रिन्यूवल, आयुष उपचारांसहित विस्तारित कव्हरेज, दीर्घकालीन फ्री-लूक कालावधी आणि कमी अधिस्थगन कालावधी सारख्या दिलासादायक बाबींचा अंतर्भाव होतो. सुलभ प्रक्रिया आणि विकसनशील लाभांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमची पॉलिसी सुरक्षित करण्याची वेळ आता आली आहे.
मूल्यमापन, निवड, इन्श्युअर- हेल्थ इन्श्युरन्स निवडीला सुरुवात करताना तुमचे वय आणि आरोग्य स्थिती यांच्या आधारावर तुमच्या गरजांचे मूल्यमापन करावे. प्लॅनची कव्हरेज व्याप्ती, प्रतीक्षा कालावधी, अपवाद यांच्यासह विविध प्लॅनचा तुम्ही तुलनात्मक अभ्यास करा. रेग्युलेटरने केलेल्या अलीकडील बदलामुळे प्रक्रिया अधिकच कस्टमर फ्रेंडली आणि सोपी बनली आहे. जर ज्येष्ठ नागरिक हे इन्श्युअर्ड नसल्यास तुमच्या ज्येष्ठ कौटुंबिक सदस्यांच्या कव्हरेजची सुनिश्चिती करण्याची हीच अचूक वेळ आहे. यासोबतच IRDAI द्वारे अनिवार्य केलेल्या कस्टमर इन्फॉर्मेशन शीटच्या (सीआयसी) समावेशामुळे पॉलिसीधारकाला कोणत्याही अपवादाच्या माहितीसह कव्हरेज बाबत स्पष्टता मिळते.ज्यामुळे कस्टमरला पारदर्शकतेची सुनिश्चिती मिळते.
प्रतीक्षा कालावधी पासून चिंतामुक्ती – ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्व-विद्यमान आजारांसाठी असलेला प्रतीक्षा कालावधी हा चिंतेचा विषय ठरतो. तथापि, IRDAI च्या अलीकडील दिशानिर्देशानुसार, सर्वांसाठी हेल्थ इन्श्युरन्सच्या प्रतीक्षा कालावधी साठी 36 महिन्यांपर्यंत मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, विचाराधीन असलेले दोन मुख्य प्रतीक्षा कालावधी आहेत. पूर्व विद्यमान आणि विशिष्ट. ज्यासाठी कमाल 36 महिन्यांचा मर्यादित प्रतीक्षा कालावधी आहे. काही ज्येष्ठ नागरिकांसाठीचे इन्श्युरन्स प्लॅन्स कमी अवधीचा प्रतीक्षा कालावधी ऑफर करतात. विशिष्ट आजार आणि पूर्व-वैद्यकीय स्थिती साठी 12 महिन्यांपर्यंतच्या कमी अवधी साठी प्रतीक्षा कालावधी ऑफर करतात. तथापि, या पॉलिसीसाठी अधिक प्रीमियम असू शकतो. ज्यामुळे विशिष्ट आजारांसाठी जलद कव्हरेज प्रदान करण्याद्वारे संरक्षण प्राप्त होते.
बहुतांश इन्श्युरन्स कंपन्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी जारी करण्यापूर्वी पूर्व-वैद्यकीय चाचणी साठी विचारणा करतात. तथापि, जर तुम्हाला काही पूर्व वैद्यकीत स्थिती असल्यास तुमचे रेकॉर्ड इन्श्युरन्स कंपनीला प्रदान करणे हा सर्वोत्तम मार्ग ठरतो. अशाप्रकारची माहिती सामायिक करण्यामुळे, इन्श्युरर तुमच्या मेडिकल रेकॉर्डचे मूल्यमापन करू शकतात आणि पूर्ण क्षमतेने किंवा काही बंधने निश्चित करुन तुमचा प्रस्ताव स्विकारु शकतात. यामुळे क्लेम वेळी नकाराला सामोरे जाण्याची शक्यता घटते. मेडिकल रेकॉर्ड आणि आरोग्य स्थिती घोषित करताना पारदर्शकतेची आग्रही भूमिका घ्या. याव्यतिरिक्त, मॉड्युलर आणि लवचिक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनची निवड करण्यामुळे कस्टमाईज्ड पर्याय उपलब्ध होतात. अशा प्लॅनमुळे तुम्हाला 12 ते 36 महिने कालावधी पर्यंतचा प्रतीक्षा कालावधी निवडण्याची मुभा मिळते. ज्यामुळे प्रतीक्षा कालावधी सोबत तुम्हाला समायोजन साधता येते. परिणामस्वरुप, प्रीमियम हे अधिक वैयक्तिकृत आणि अनुकूल कव्हरेज दृष्टीकोन ऑफर करते.
कमी प्रीमियम खर्चात खास कव्हरेज: अनेक ज्येष्ठ्यांना हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमच्या वाढत्या खर्चाबाबत चिंता असते. तथापि,वैयक्तिक गरजांना अनुरुप सहजगत्या उपलब्ध होणारे अनेक प्लॅन्स आहेत. तुम्हाला मॉड्युलर प्लॅन निवडायचा आहे आणि तुम्हाला हव्या असलेल्या फीचर्सचा त्यामध्ये समावेश करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला जे हवे त्यासाठी देय करायचे आहे. यामुळे प्रीमियमचे व्यवस्थापन होईल आणि सोबतच सर्वसमावेशक लाभ तुम्हाला प्राप्त होतील. याद्वारे तुम्ही तुमचे कव्हरेज कस्टमाईज्ड करू शकतात. आऊटपेशंट केअर साठी डबल बेनिफिट, 5 कोटी रुपयांपर्यंत अधिक कव्हरेजचा पर्याय आणि आपत्कालीन स्थितीत इमर्जन्सी कव्हरेज यासारखे लाभ मिळवू शकतात. अन्य लाभ ज्यामध्ये होम नर्सिंग कव्हर, एकत्रित बोनस, अवयव प्रत्यारोपणाच्या दरम्यान डॉक्टरांच्या अंतर्गत उपचारासाठी वैद्यकीय खर्चाची पूर्ती यांचा समावेश होतो.
अतिरिक्तपणे, आंतररुग्ण उपचार, इन्श्युरन्स रकमेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारांवरील वैद्यकीय खर्चाला कव्हर . तथापि, अन्य लाभांपैकी महत्वाचा लाभ म्हणजे पॉलिसीधारक हे वर्षातून एकदा पॉलिसी वर्षात मोफत प्रतिबंधात्मक वैद्यकीय तपासणी करू शकता. कव्हरेजचा विस्तार, प्रीमियमचे व्यवस्थापन: वैद्यकीय महागाईला अनुरुप दरवर्षी इन्श्युरन्स रकमेत वाढ करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनची निवड करण्याची शिफारस केली जाते. काही प्लॅन्स मध्ये अंतर्भृत महागाई संरक्षक वैशिष्ट्ये असतात. तर काही अड-ऑन म्हणून सुविधा उपलब्ध करुन देतात. अधिक इन्श्युरन्स रक्कम असल्यामुळे तुम्हाला वाढत्या वैद्यकीय खर्चापासून विशेषत्वाने कॅन्सर आणि अन्य घातक विकारांपासून संरक्षण प्राप्त करण्याची सुनिश्चिती मिळते.
तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल की, तुम्ही कमी कव्हरेज किंवा कमी सब-लिमिट असलेल्या प्लॅन ऐवजी एकूण वजावट असलेल्या प्लॅनची निवड करू शकतात. तुमच्या इन्श्युरन्सला प्रारंभ करण्यापूर्वी देय करावयाची रक्कम ही वजावट मानली जाते. एकूण वजावटीचा पर्याय निवडण्याद्वारे, तुम्ही वैद्यकीय खर्च सामाईक करण्यासाठी सहमती व्यक्त करता. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रीमियम मध्ये सवलतीच्या स्वरुपात लाभ मिळतो.
सर्वसमावेशक रायडर्स सह हेल्थ इन्श्युरन्सचा विस्तार: बेस हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन मध्ये रायडर्सचा समावेश करणे व्यक्तींना निश्चितच योग्य निर्णय वाटत आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वसमावेश सपोर्ट प्रदान करण्याची वाढती मागणी विचारात घेऊन अनेक इन्श्युरन्स कंपन्या खास ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्मित रायडर्स ऑफर करतात. या रायडर पर्यायांचा एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे वैयक्तिक प्राधान्ये सामावून घेण्याची त्यामध्ये असलेली लवचिकता होय. अशाप्रकारच्या रायडर्स मुळे तुम्हाला विस्तृत लाभ मिळू शकतील हे ऐकून तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल. रुग्णवाहिका कव्हरेज ते प्रगतीशील वैशिष्ट्ये जसे की फॉल डिटेक्शन टेक्नॉलॉजी सारख्या लाभांचा अंतर्भाव होतो.
उदाहरणार्थ, काही कोसळण्याच्या/पडण्याच्या स्थितीत स्मार्टवॉच मध्ये असलेल्या फॉल डिटेक्शन टेक्नॉलॉजी मुळे वेळेपूर्वीच अलर्ट मिळतो. ज्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना अमूल्य स्वरुपाची मन:शांती प्राप्त होते. यासोबतच इन-होम फिजिओथेरपी सेशन्स आणि थेट घरी प्रोफेशनल नर्सिंग केअर सारख्या सुविधा यामध्ये आहेत. ज्यामुळे राईडर पॅकेजच्या सर्वसमावेशकतेत वाढ होते.
रायडर्सद्वारे मेडिकल टेलि-कन्स्ल्टेशन सर्व्हिस आणि सायकॉलॉजिकल स्थितीत विशेषकृत कन्सल्टेशन ऑफर केले जाते. सुलभ आणि वेळेवर हेल्थेकेअर संसाधने प्रदान करण्याद्वारे ज्येष्ठांच्या काळानुरुप गरजांची पूर्तता केली जाते आणि सर्वसमावेश सपोर्ट सिस्टीम उपलब्धतेची खात्री केली जाते. अशा स्वरुपाचे सर्वसमावेशक आणि प्रगतीशील रायडर पर्याय प्राप्त करण्याद्वारे, समर्पित केअर आणि तत्काळ उपलब्ध योग्यतेच्या आधारे ज्येष्ठ नागरिक योग्य प्रकारे त्यांच्या संपत्तीचे आणि सुरक्षिततेचे व्यवस्थापन करू शकतात.
जेष्ठ नागरिकांसाठी हेल्थ इन्श्युरन्सची निवड करतेवेळी, सर्वसमावेशक उपाय आणि अडचणींवर तोडगा काढण्यासाठी इन्श्युरर्स आणि IRDAI संयुक्तपणे काम करतात. त्यांनी निर्धारित केलेल्या नियमनामुळे विविध व्यक्ती गटांच्या अनुरुप प्रॉडक्ट्स निर्मिती, आजीवन रिन्यूवल योग्यता आणि प्रतीक्षा कालावधीत कपात यासारख्या घटकांचा समावेश होतो. तुमचे पालक किंवा ज्येष्ठ स्नेहीजनांना सर्वसमावेशक हेल्थ कव्हरेजची सुनिश्चिती करण्याची हीच अचूक वेळ आहे. याप्रकारचे पाऊल उचलण्याद्वारे तुम्ही त्यांच्या वैद्यकीय गरजांसाठी केवळ आर्थिक सुरक्षिततात सुनिश्चित करीत नाही. तर त्यांना भावी जीवनात स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी स्वयंपूर्ण बनवित आहात.