• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग येथे क्रिकेट नियम परिसंवादाचे आयोजन

ByEditor

Feb 9, 2025

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील क्रिकेट पंच व क्रिकेट प्रेमींसाठी माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग यांच्या पुढाकाराने व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने गुरुवार, दि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अलिबाग येथे क्रिकेट नियम समजून घेण्यासाठी एक दिवसाच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ह्या परिसंवादात क्रिकेटचे नियम शिकवले जाणार असून उपस्थित लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली जाणार आहेत. परिसंवादासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हर्षद रावले (बीसीसीआय पंच व माजी रणजीपट्टू), राजन कसबे (पंच एमसीए, मुंबई), नयन कट्टा (एमसीसी लॉ अभ्यासक व मार्गदर्शक) उपस्थित राहणार आहेत. सदर परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे नोंदणी अंतिम तारीख १० फेब्रुवारी असून उपस्थित क्रिकेटपटूंना प्रमाणपत्र देण्यात येतील. अधिक माहितीसाठी संदीप जोशी (९१५८८२४२३३), डॉ. राजाराम हुलवान (७७२०९८१०००) यांच्याशी संपर्क साधावा.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!