• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

हिंजवडी जळीत कांडाचा चालकच ‘मास्टरमाईंड’, चालकाच्या डोक्यात शिजत होता अनेक दिवसांपासून कट

ByEditor

Mar 21, 2025

पुणे : दि. १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हिंजवडीत मिनी बसला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर एक हादरवून सोडणारे सत्य समोर आले. ही दुर्घटना नसून एक सुनियोजित कट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बसचालकानेच जळीत हत्याकांड घडवून आल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बसचालक जनार्दन हंबर्डेकर (वय ५६) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान बसचालक जनार्दन हंबर्डीकर याने हा संपूर्ण कट रचल्याची कबुली पोलिसांना दिली. या जळीत हत्याकांडाचा उलघडा नेमका कसा झाला, तर चालकाने पोलिसांना दिलेला जबाब आणि प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या जबाबांमध्ये पोलिसांना विसंगती आढळून आली. यानंतर हे संपूर्ण प्रकरण दुर्घटना नसून सुनियोजित कट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यादृष्टाने पोलिसांना तपासाची चक्रे फिरवली.

जबाबांमध्ये आढळली विसंगती

हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता प्रत्यक्षदर्शीच्या जबाबांमध्ये आणि चालकाच्या जबाबामध्ये मोठा फरक असल्याचे आढळून आले. तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचे पोलिसांनी विश्लेषण केले. तपासादरम्यान हंबर्डीकर याची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांना हंबर्डीकर याच्या जबाबातील विसंगती आढळून आल्याने तसेच तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांमुळे पोलिसांचा हंबर्डीकर याच्यावरचा संशय बळवला आणि त्यानंतर या कटाचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

माझा रोष वेगळ्या लोकांवर होता, पण…

कंपनीकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने चालकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. पण त्याच्या या कृत्यामुळे बसमधील चार निष्पापांना आपला जीव गमावावा लागला. “माझा रोष वेगळ्या लोकांवर होता, पण या घटनेत त्यांचा काहीही दोष नसताना त्यांचे प्राण गेले. माझा हेतू केवळ कंपनीला धड शिकवण्याचा होता,” असे हंबर्डीकरने पोलिसांना चौकशीवेळी सांगितले. ही घटना घडल्याच्यावेळी बसमधील चालकासह कर्मचाऱ्यांनी उड्ड्या मारल्या, पण चार जण आतमध्येच राहिले. मागचा दरवाजा बंद असल्याने त्यांना बसमधून बाहेर पडता आले नाही. आग लागल्यानंतर मागचा दरवाजा का उघडला नाही याचा तपास पोलिस करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!