• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मेजेस जाईना…स्टेटस अपडेट होईना; व्हॉट्सॲप डाऊन, नेटकरी नाराज

ByEditor

Apr 12, 2025

मुंबई : सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग मोबाईल ॲपप्लिकेशन WhatsApp डाऊन असून अनेकांना त्याचा वापर करण्यात अडचण येत आहे. शनिवारी (१२ एप्रिल) सायंकाळी अनेक नेटकऱ्यांनी व्हॉट्सॲपवर स्टेट्स ठेवण्यास आणि संदेश पाठवण्यास अडचण येत असल्याची तक्रार केली आहे.

Down Detector नुसार सायंकाळी ५.२२ पर्यंत अनेक व्हॉट्सॲप युझर्सना अडचणींचा सामना करावा लागला. याप्रकरणी ५९७ जणांनी अडचण येत असल्याचे नमूद केले. संदेश पाठवण्यास अडचणी येत असल्याची तक्रार जवळपास ८५ टक्के लोकांनी उपस्थित केली आहे. १२ लोकांना ॲप संबधित इतर तक्रारी केल्या आहेत तर ३ टक्के लोकांना लॉगिनची समस्या निर्माण झाली. Down Detector विविध प्लॅटफॉर्मच्या मदतीने अशा पद्धतीच्या आऊटेज संबधित माहिती
एकत्रित करत असते.

काही व्हॉट्सॲप युझर्सना स्टेटस अपलोड करण्यास अडचण येत आहे, तर काहींना ग्रुपवर मेसेज पाठवताना समस्या निर्माण होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर याप्रकरणी लोकांनी भाष्य करण्यास सुवात केली आहे. अनेकांनी #Whatsappdown असा हॅशटॅग वापरुन व्हॉट्सॲप व्यवस्थित चालत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. अशाच पद्धतीची समस्या यापूर्वी फेब्रुवारीच्या महिन्यात आली होती. यामुळे जगभरातील अनेक युझर्सना व्हॉट्सॲप व्यवस्थित वापरण्यास अडचण येत होती. अनेकजणांना मेजेस पाठवण्यास, स्टेट्स ठेवण्यास तसेच, कॉल करण्यास अडचण आली होती. दरम्यान, शनिवारी देशभरात अनेकांना युपीआय पेमेंट करण्यास अडचण निर्माण झाली. गुगल पे, फोन पेसह इतर अनेक ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म डाऊन झाल्यानंतर आता व्हॉट्सॲप डाऊन झाल्याने अनेक युझर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!