• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्या नराधमांचा खरा चेहरा उघड, दहशतवाद्यांचा फोटो आला समोर

ByEditor

Apr 23, 2025

वृत्तसंस्था
नवी दिल्ली :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. मंगळवारी (22 एप्रिल) घडलेल्या या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतर हा दुसरा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. चार ते पाच दहशतवाद्यांनी दुपारच्या सुमारास पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात 28 पर्यटकांनी आपले प्राण गमावले आहेत. या हल्लेखोरांची ओळख आता पटली असून त्यांचा फोटो समोर आला आहे.

पहलगाममधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणारे बैसरन खोरे हे पर्यटकांचे नेहमीच आकर्षणाचे केंद्र असते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी होत असते. याच ठिकाणी दहशतवाद्यांनी बेछूट गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे एनआयएने स्केच प्रसिद्ध केले होते. मात्र, आता या दहशतवाद्यांचा एकत्रित फोटो समोर आला आहे. पाकिस्तानस्थित लष्कर एक तैयब्बाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे.

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी क्शन मोडवर दिसत आहेत. या हल्ल्याची माहिती मिळताच आफला सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावर सोडून मोदी मायदेशी परतले आहेत. बुधवारी सकाळी त्यांचे विमान दिल्ली विमानतळावर उतरले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळावरच उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षा एजन्सीचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सुद्धा उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!