• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खोपोली : आदर्श पतसंस्थेची १८वी शाखा स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित

ByEditor

Jul 1, 2025

प्रतिनिधी
अलिबाग :
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या खोपोली शाखेचे नव्या जागेत भव्य स्वरूपात स्थलांतर करण्यात आले असून, ही शाखा आता युनिमाउंट एंपायर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्वमालकीच्या जागेत कार्यरत झाली आहे. रविवारी, २९ जुलै रोजी झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

खालापूर तालुक्याचे सहकारी संस्था सहाय्यक निबंधक नीलेश शिंदे यांच्या हस्ते फीत कापून शाखेच्या नव्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. यावेळी खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर हेही उपस्थित होते.

आदर्श कार्यपद्धतीवर ग्राहकांचा विश्वास

उद्घाटनप्रसंगी बोलताना नीलेश शिंदे म्हणाले, “आदर्श पतसंस्थेचा कारभार नावास साजेसा असून संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. त्यामुळेच नागरिकांचा विश्वास संस्थेवर अधिकाधिक वाढत आहे.”

त्याचप्रमाणे दत्ताजीराव मसुरकर यांनी संस्थेच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या आठवणी सांगत, “संस्थापक सुरेश पाटील यांनी पतसंस्थेला राजकारणमुक्त ठेवले, म्हणूनच आज ती यशाच्या शिखरावर पोहोचली आहे,” असे सांगितले.

सहा महिन्यात २ कोटींचा व्यवसाय

ही शाखा सहा महिन्यांपूर्वी भाड्याच्या जागेत सुरू झाली होती. अल्प कालावधीतच सुमारे २ कोटी रुपयांचा व्यवसाय साध्य करून ही शाखा आता स्वमालकीच्या स्थळात स्थलांतरित करण्यात आली आहे, ही एक अत्यंत उल्लेखनीय कामगिरी आहे.

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे, संस्थापक सुरेश पाटील, संचालक अनंत म्हात्रे , सतीश प्रधान, विलाप सरतांडेल, भगवान वेटकोळी, रामभाऊ गोरीवले, तज्ञ संचालक संजय राऊत (सनदी लेखापाल), तज्ञ संचालक डॉ. मकरंद आठवले, सीईओ मीनाक्षी पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य अधिकारी उमेश पाटील यांनी केले. अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी संस्थेच्या यशाचा आढावा घेतला, तर कैलास जगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!