• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ 6 अत्यंत हेल्दी पदार्थ, एकही औषध न घेता झटक्यात कंट्रोल होईल डायबिटीज व ब्लड प्रेशर

ByEditor

Jul 8, 2025

रायगड जनोदय ऑनलाईन
आजच्या काळात मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार लोकांवर वेगाने परिणाम करत आहेत. पण जर दिवसाची सुरुवात योग्य गोष्टींनी केली तर औषधांशिवायही या आजारांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवता येते. आयुर्वेद आणि न्युट्रिशन एक्सपर्टचंही असं म्हणणं आहे की रिकाम्या पोटी काही गोष्टी खाल्ल्याने रक्तातील साखर आणि रक्तदाब संतुलित राहतो. येथे आम्ही तुम्हाला अशा ६ नैसर्गिक गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्या जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि पचन देखील सुधारते.

उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आता जणू सर्वसामान्य आजार झाले आहेत. औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी अनेक जण नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत. अशा वेळी सकाळी घेतलेले काही खास पेय शरीरासाठी अमृततुल्य ठरू शकतात. त्यात असलेले नैसर्गिक घटक केवळ रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवत नाहीत, तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात, पचन सुधारतात आणि हृदयाचं आरोग्य जपतात.

विशेषतः आयुर्वेदात सांगितलेल्या काही घरगुती गोष्टी जर रोजच्या दिनचर्येत सामील केल्या, तर त्यांच्या परिणामकारकतेचा अनुभव काही दिवसांतच येऊ शकतो. चला तर, जाणून घेऊया 5 शक्तिशाली पेय जे तुमचं रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरतात.

दालचिनी आणि काळीमिरी मिसळलेलं कोमट पाणी

दालचिनीमध्ये ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात, तर काळी मिरी शरीरातील सूज कमी करण्याचं काम करते. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि एक चिमूटभर मिरी पूड मिसळून प्यायल्यास चयापचय क्रिया वेगवान होते आणि साखर नियंत्रणात राहते. हे पाणी फक्त मधुमेहासाठीच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं.

मेथी दाण्यांचं भिजवलेलं पाणी

एक चमचा मेथीचे दाणे रात्री भिजत घालून ठेवावेत आणि सकाळी त्या पाण्याचं सेवन करावं. मेथीत नैसर्गिकरित्या रक्तातील साखर कमी करण्याची क्षमता असते. त्याशिवाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं, पचनक्रिया सुधारणं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवणं हेही फायदे आहेत. नियमित सेवनाने पोट हलकं राहातं आणि चयापचय सुधारतो.

हळद आणि लिंबूपाणी

​हळद हे एक गुणकारी अँटीऑक्सिडंट आहे तर लिंबू व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, त्वचा उजळते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. विशेषतः हिवाळ्यात हे पाणी शरीरात उष्णता निर्माण करतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतं.

अलसीचे बीज

अलसीमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. सकाळी उपाशी पोटी एक चमचा अलसीच्या बिया चघळून खाल्ल्या किंवा कोमट पाण्यासोबत घेतल्या, तर रक्तातील साखर आणि प्रेशर दोन्ही नियंत्रणात राहतात. याचे नियमित सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शिवाय यामुळं पचनक्रिया सुरळीत राहते आणि भूक नियंत्रित होते.

टोमॅटो आणि डाळिंबाचा रस

टोमॅटो आणि डाळिंब हे दोघंही अँटीऑक्सिडंट्सनी भरलेले आहेत. रोज सकाळी रिकाम्या पोटी या रसाचं सेवन केल्यास हृदय अधिक मजबूत राहतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. डाळिंबाच्या बीजांमध्ये नायट्रिक ऑक्साइड वाढवण्याची क्षमता असते, ज्यामुळे रक्तवाहिन्या प्रसन्न राहतात. हा रस त्वचेसाठीही लाभदायक ठरतो.

(Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!