• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सकाळी चालायला जाण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा फायद्याऐवजी तुमच्या आरोग्याची होईल हानी

ByEditor

Jul 9, 2025

रायगड जनोदय ऑनलाईन
सकाळी चालण्यानं दिवसभर छान ताजंतवानं वाटतं. मॉर्निंग वॉक केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. म्हणूनच स्वतःला तंदुरुस्त आणि उर्जेने परिपूर्ण ठेवण्यासाठी बहुतांश लोक सकाळी चालण्याचा व्यायाम पसंत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की Morning Walk करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे? मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घेतली नाही तर फायदा होण्याऐवजी तुमच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.

वॉकला सुरुवात करण्याआधी पाणी प्या

तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमचं शरीर आधीच डिहायड्रेटेड असतं. तुम्ही ६-८ तास पाणीही न पिता राहिलेले असता. त्यामुळे पाणी न पिता बाहेर फिरायला जाणे धोकादायक ठरू शकतं. तुमच्या शरीरात आधीपासूनच द्रवपदार्थांची कमी असेल, तर घामाच्या अभावी फार वेगात शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. परिणामी स्नायूत पेटके येणं, डोकेदुखी आणि थकवा येणं, असा त्रास होऊ शकतो. म्हणून सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास पाणी प्या.

रिकाम्यापोटी वॉकला जाऊ नये

रिकाम्यापोटी चालल्यानं वजन लवकर कमी होईल असं अनेकांना वाटतं.यात तथ्य नसलं तरी तुम्ही रिकाम्या पोटी फिरायला गेलात तर तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा डोकेदुखी होऊ शकते. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यामुळे अशक्तपणा, मळमळ किंवा चालताना बेशुद्ध पडणं असा त्रास होऊ होऊ शकतो. अशा परिस्थितीत चालण्यापूर्वी पूर्ण नाश्ता करण्याची गरज नाही. पण काहीतरी हलकं खाणं ठीक राहील. जसं की केळी, मूठभर भिजवलेले बदाम, अर्धा टोस्ट किंवा एक फळांची थोडी स्मूदी.

वार्म-अप अवश्य करा

चा​लण्यापूर्वी एक छोटंसं स्ट्रेचिंग रूटीन तुमच्या निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही सकाळी फक्त ३० मिनिटं चालत असाल तरीही कमीत कमी ३-५ मिनिटं वॉर्म-अप करा. वॉर्म अप करण्यासाठी घोटे फिरवा, पायाच्या बोटांना हलके स्पर्श करा, खांदे हलवा आणि मान दोन्ही दिशांना फिरवा.

वॉकला जाण्याआधी कॉफी नको

अनेकांना फिरायला जाण्यापूर्वी गरम चहा किंवा कॉफी प्यायला आवडतं. पण चालण्यापूर्वी कॅफिनचं सेवन करणं हानिकारक असू शकतं. काही लोकांसाठी रिकाम्यापोटी कॅफिन घेतल्यानं चालताना आम्लपित्त किंवा पोट खराब होऊ शकतं. तुम्ही चहा किंवा कॉफीशिवाय काम करू शकत नसाल तर चालणं झाल्यानंतर चंहा किंवा कॉफी प्या. अशाप्रकारे तुमची पचनक्रिया सक्रिय राहील आणि तुम्ही पुन्हा हायड्रेटेड व्हाल.

सकाळी चालण्याचे काही प्रमुख फायदे

वजन कमी: चालणं कॅलरीज बर्न करण्यास मदत करतं, ज्यामुळे वजन कमी होतं.

हृदय निरोगी राहतं: चालल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

हाडं मजबूत होतात: चालणं हाडांना मजबूत करतं, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.

चयापचय क्रिया सुधारते: चालल्यानं चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!