• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एसटी बसचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, नऊ प्रवासी जखमी

ByEditor

Jul 11, 2025

खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. बस एका कंटेनरला मागून धडकल्याने बस चालकाचा जागीच मृत्यू झाला, ज्यात इर्शाद अब्दुल मजीद शेख यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत नऊ प्रवासी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. बारामतीहून मुंबईला निघालेल्या बसला हा अपघात कुणे पुलाजवळ झाला.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस एका कंटेनरला मागून धडकल्याने बस चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील नऊ जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे अडीच वाजता झाला. इर्शाद अब्दुल मजीद शेख (वय ३८, रा. आष्टी, बीड) असे अपघातात मृत्यू झालेल्या एसटी बस चालकाचे नाव आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खंडाळा घाटात एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरात धडक दिली. या अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील तिघे गंभीर आहेत. हा अपघात गुरुवारी (१० जुलै) पहाटे अडीचच्या सुमारास खंडाळा घाटातील कुणे पुलाजवळील उतारावर झाला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!