• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धा : रायगड रॉयल्स संघाने “औरत है तो भारत है” कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचा केला सन्मान

ByEditor

Jun 19, 2024

क्रीडा प्रतिनिधी
पुणे :
महाराष्ट्र प्रिमियर लिग हि महाराष्ट्रातील एकमेव टी-२० क्रिकेट लिग स्पर्धा आहे ज्याची सुरुवात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने करण्यात आली. महाराष्ट्रातील महिलांच्या यशाचा उत्सत्व साजरा करण्यासाठी एमपीएलने “औरत है तो भारत है” कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम शनिवारी पुण्यातील आंतरराष्ट्रीय मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रायगड रॉयल्स विरुद्ध पुणेरी बाप्पा ह्या सामान्याच्या दरम्यान ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध भागातून ५ हजारहुन अधिक महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी एमपीएल स्पर्धेतील संघ रायगड रॉयल्स यांनी आमंत्रित करण्यात आलेल्या महिलांसाठी वाहतूक आणि भोजनाची सर्व समावेशक व्यवस्था देखील करण्यात आली होती. ह्यावेळी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला रायगड रॉयल्स संघाच्यावतीने कौतुक प्रतिक म्हणून “औरत है तो भारत है” ही खास जर्सी भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळालेल्या नामवंत महिलांचा समावेश होता. राज्यातील विविध भागातील बचत गटातील महिलांचा देखील यामध्ये समावेश होता. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, ऑलम्पियन अंजली भागवत, मेरी कॉम, राही सरनोबत यांचा सन्मान रायगड रॉयल्स संघाचे मुख्य संचालक पराग मोरे, संघ मालक कपिल बाहेटी व अलिषा बाहेटी यांच्या हस्ते करण्यात आला. सुप्रसिद्ध ऑलम्पियन मेरी कॉम हिने महिलांना मार्गदर्शन करतांना एमपीएल व रायगड रॉयल्स संघांनी महिलांच्या मेहनतिला, प्रयत्न, चिकाटी, संयम आणि समर्पणाविषयी गौरव आणि सन्मान करत असल्याचा आनंद होत असल्याचे सांगितले.

ह्या प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते. त्यांनी एमपीएल आणि रायगड रॉयल्स संघांनी घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले. रायगड रॉयल्स संघातील सर्व खेळाडूंनी मॅच दरम्यान आपल्या आईचे नाव मागे असलेली जर्सी परिधान केली होती. रायगड रॉयल्स संघातर्फे राज्यातील विविध भागातून आलेल्या महिलांचा सत्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील होतकरू व नावलौकिक मिळवलेल्या महिलांचा सन्मान केल्याने रायगड रॉयल्स संघाचे राज्यभरात सर्वत्र कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!