सलीम शेख
माणगाव : माणगाव नगरपंचायत हद्दीतील एकतानगर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रुपेश जाधव यांना उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते व विधिमंडळ पक्षप्रतोद आ. भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते हिरकणी पुरस्काराने आकर्षक सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन शनिवार, दि.५ ऑक्टोबर २०२४ रोजी कुणबी भवन हॉल निजामपूर रोड माणगाव याठिकाणी तालुका पत्रकार संघाच्या झालेल्या भव्यदिव्य अशा कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. सुवर्णा जाधव यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
सुवर्णा जाधव या माणगाव तालुक्यात सामाजिक बांधिलकी व जातीय सलोखा राखून समाजात काम करीत आहेत. विविध सामाजिक उपक्रम त्या माणगाव शहरात तसेच मुंबईमध्ये सातत्याने राबवित असतात. विविध संस्था-संघटनांवर त्या महत्वाच्या पदावर काम करीत आहेत. समाजातील गोरगरीब जनतेसाठी त्या काम करीत असतात. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या विशेष प्रयत्नशील असतात. विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने तसेच स्वखर्चाने त्या विविध उपक्रम समाजातील गोरगरीब जनतेसाठी राबवित असतात. त्याच बरोबर क्रीडा क्षेत्रात तरुणांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या सामाजिक दायित्वाची दखल माणगाव तालुका पत्रकार संघाने घेत आ. भरत गोगावले यांच्या हस्ते त्यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माणगाव नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे,उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर-काळे,माणगाव पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता बक्कम, पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख, उद्योजक विजयशेठ मेथा, तरुण मराठी उद्योजक सुभाष दळवी, नगरपंचायतीचे नगरसेवक राजेश मेहता, नगरसेवक दिनेश रातवडकर,माजी नगरसेवक नितीन बामगुडे,आदर्श शिक्षिका विनया जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास डॉ. सचिन चव्हाण, व्यापारी संतोष मेथा, संतोष दोशी,विक्रांत सप्रे, दिनेश मेथा, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष मजिदभाई हाजिते, ज्येष्ठ सल्लागार आजेश नाडकर, उपाध्यक्ष प्रभाकर मसुरे, उपाध्यक्ष निलेश म्हात्रे, सचिव सचिन देसाई, सहसचिव स्वप्ना साळुंके, प्रवक्ता संतोष गायकवाड, साईचे माजी सरपंच हुसेन राहटविलकर, अहमद गैबी, राजू मोरे, शिक्षक शब्बीर हज्जू व शिक्षिका अपूर्वा जंगम, एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक राहुल दसवते, माणगाव टिकमभाई कॉमर्स कॉलेजचे डॉ. जगदीश शिगवण, विवा कॉलेजचे उपप्राचार्य योगेश रानभरे, विद्यार्थी, नागरिक बंधू-भगिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.