• Wed. Aug 6th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिजवलेले अन्न किती काळ फ्रीजमध्ये ठेवावं? जाणून घ्या अन्यथा होऊ शकते विषबाधा

ByEditor

Aug 3, 2025

रायगड जनोदय ऑनलाईन
सर्वच ऋतूंमध्ये घरांत रेफ्रिजरेटरचा वापर हा सारखाच केला जातो. रेफ्रिजरेटर अन्नपदार्थ साठवण्यासाठी आणि ते दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. बऱ्याचदा, आपण शिजवलेले अन्न किंवा कोणतेही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतो. आणि पुन्हा पुन्हा वापरतो. पण आपण अन्न फ्रिजमध्ये ठेवलं तरी ते नेहमीच फ्रेश राहतं असं नाही तेही खराब होतचं. पण नक्की किती दिवसांनी ते फार कमी जणांना माहित आहे. फक्त ते लवकर खराब होत नाही एवढंच. मग ते किती दिवसांपर्यंत वापरू शकतो चला जाणून घेऊयात.

तज्ज्ञांच्या मते, रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ अन्न साठवणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. त्यामुळे सामान्य पदार्थांबद्दल आणि त्यांच्या साठवणूकीबद्दल जाणून घेऊयात. तज्ञांच्या मते, रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ अन्न साठवणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ किती दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊ शकतो आणि ते खाऊ शकतो ते जाणून घेऊयात.

मळलेले पीठ इतके दिवस ठेवा.

काही लोकांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी भरपूर पीठ मळून ठेवण्याची सवय असते. तर ही सवय अजिबात योग्य नाही. खरं तर, फ्रिजमध्ये बराच काळ ठेवलेले पीठ आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. सकाळी मळून संध्याकाळपर्यंत फ्रिजमध्ये ठेवलेल्या पीठाचा वापर करू शकता, परंतु 2 ते 3 दिवस जुने पीठ अजिबात वापरू नका. त्यात हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे पोटात बद्धकोष्ठता, आम्लता इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

शिजवलेला भात फ्रीजमध्ये इतका वेळ ठेवा.

शिजवलेला भातही जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये जास्त काळ साठवलेल्या भातामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, जे पोटासाठी हानिकारक ठरू शकतात. शिजवलेला भात जास्तीत जास्त एका दिवसासाठी फ्रिजमध्ये ठेवणे सुरक्षित मानले जाते. यापेक्षा जास्त वेळ साठवून ठेवल्याने आणि नंतर खाल्ल्याने अपचन होऊ शकते किंवा इतर समस्या उद्धभवू शकतात.

शिजवलेली डाळ

शिजवलेली डाळ देखील दोन दिवसांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नये, अन्यथा आरोग्याला फायदा होण्याऐवजी हानी पोहोचवू शकते. शिजवलेली डाळ जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात. तसेच, ही डाळ खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटात आम्लता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

शिजवलेल्या भाज्या अशा प्रकारे साठवा

कोणतीही शिजवलेली भाजी फक्त 4 ते 5 तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवावी. त्यानंतर ती वापरावी. विशेषतः मसाले असलेल्या भाज्या कधीही जास्त काळ साठवू नयेत. खरं तर, भाज्या जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव खराब होते. तसेच, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

रेफ्रिजरेटरमध्ये अन्न साठवताना या गोष्टी लक्षात ठेवा

शिजवलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. सर्वप्रथम, तुमचा फ्रिज स्वच्छ असल्याची खात्री करा, कारण घाणेरड्या फ्रिजमध्ये असलेले बॅक्टेरिया तुमचे अन्न लवकर खराब करू शकतात आणि संक्रमित करू शकतात. याशिवाय, एकाच वेळी फ्रिजमध्ये भरपूर अन्न साठवणे टाळा. असे केल्याने, फ्रिजमध्ये हवा जाण्यासाठी जागा राहत नाही. ज्यामुळे बॅक्टेरिया लवकर वाढू लागतात. तसेच, अन्न शिजवल्यानंतर एक किंवा दोन तासांनीच फ्रिजमध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्ही ते वापरासाठी बाहेर काढता तेव्हा ते गरम केल्यानंतरच वापरा. फ्रिजमध्ये अन्न साठवताना, त्याचे तापमान फक्त 2 ते 3 अंश ठेवा.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!